समजा तुम्ही आऊटडोअर इव्हेन्ट फोटोग्राफी करताय आणि ऑर्डर संपल्यावर लगेचच सध्याच्या ट्रेंड प्रमाणे पार्टीने सोशल मीडियासाठी तुमच्याकडे काही फोटोंची मागणी केली गेलीये किंवा एखादे कमर्शियल फोटो शूट संपवून प्रवासात असताना प्रेझंटेशनसाठी काही अर्जंट फोटो ताबडतोब देऊ शकता का ? अशी जर कंपनी मॅनेजर कडून विचारणा झालीये किंवा एखाद्या ट्रिप ला गेल्यावर तिथल्या साईट साईंग चे काढलेले फोटो सोशल मीडियावर शेअर करायचेत आणि या सर्व परिस्थिती मध्ये तुम्हाला फोटो एडिट करायचे आहेत पण सोबत लॅपटॉप नाहीये, अशा परिस्थितीत सापडल्यावर काय करायचं ?? ..... उत्तर सोपं आहे….. हातातल्या ‘स्मार्ट’ मोबाईल चा उपयोग करायचा..
होय ! आजच्या जमान्यातले स्मार्ट फोन चे स्पेसिफिकेशन एखाद्या कॉम्प्युटर पेक्षा कमी नाहीयेत आणि त्याच्यातील अँड्रॉईड व IOS ऑपरेटिंग सिस्टीम सुद्धा आणि एव्हढी ऍडव्हान्स झालीये कि याच्यावर कितीही क्रिटिकल ऍप्स आता सहजतेने रन होतायेत याचाच फायदा घेऊन आज अनेक सॉफ्टवेअर डेव्हलपर कंपन्यां मोबाईल वर चालणारे अँड्रॉईड व IOS सपोर्टेड प्रोफेशनल फोटो एडिटिंग ऍप्स डेव्हलप करतायेत ज्याच्यावर ऍडव्हान्स फोटो एडिटिंग करता येऊ शकते, चला तर मग! अश्याच काही, प्रत्येक फोटोग्राफरला उपयुक्त ठरू शकतील अश्या बेस्ट मोबाईल फोटो एडिटिंग ऍप्स ची आज आपण माहिती घेऊ..
*1) Adobe Lightroom* (Free, $10/Month subscription option)
फोटो एडिटिंग मध्ये विशेषतः कलर करेक्शन मध्ये आज Adobe च्या Lightroom ला कोणतीच तोड नाहीये, सन 2007 मध्ये Adobe ने लाँच केलेल्या या सॉफ्टवेअर चा वापर आज जगातील अनेक फोटो आर्टिस्ट व डिझायनर करतात, सन 2015 साली मोबाईल प्लॅटफॉर्म वर उपलब्ध झालेले Lightroom हे आपल्या पॉवरफुल फोटो एडिटिंग फीचर्स व सिम्पल इंटरफेस मुळे लाँच झाल्यापासूनच एक अत्याधिक पसंत केले जाणारे ऍप्स बनले आहे, नुकतेच Adobe ने Lightroom चे नवीन 5.2.2 हे व्हर्शन लाँच केले आहे, तसे पाहता Adobe Lightroom चे बेसिक व्हर्शन फ्री आहे पण तुम्हाला जर मल्टिपल डिव्हाईस फोटो सिंक सारखे काही ऍडव्हान्स फीचर्स हवे असतील तर मात्र तुम्हाला 10 डॉलर्स (अंदाजे 750 रुपये) प्रतिमाह चा 'फोटोग्राफी क्रिएटीव्ह क्लाउड प्लॅन' सब्स्क्रिप्शन करण्याची आवश्यकता भासू शकते..
*डाउनलोड लिंक -* https://play.google.com/store/apps/details…
*2) Adobe Photoshop Express* (Free)
फोटो एडिटिंग मध्ये आज ‘इंडस्टी स्टॅंडर्ड बनलेले’ Adobe Photoshop चे नाव माहित नाही असा फोटोग्राफर आज संपूर्ण जगात सापडणे अवघड आहे, याच Photoshop चे अँड्रॉइड / IOS व्हर्जन सुद्धा Adobe ने उपलब्ध करून दिले आहे, अर्थातच मोबाईल व्हर्शन डेस्कटॉप एव्हढे पॉवरफुल नाहीये तरी अनेक फोटो एडिटिंग टास्क करण्यासाठी Photoshop Express पुरेसं आहे, सर्वात महत्वाचे म्हणजे Adobe ने Photoshop Express फ्रि मध्ये उपलध करून दिले आहे..
*डाउनलोड लिंक -* https://play.google.com/store/apps/details…
*3) Snapseed* (Free)
स्वतः ‘गुगल’ ने मोबाईल प्लॅटफॉर्म वर उपलब्ध करून दिलेले, ज्याचा मी स्वतः प्रचंड चाहता आहे, असे Snapseed ऍप आज मोबाईल फोटो एडिटिंग मध्ये एक 'मस्ट हॅव' ऍप मानले जाते, अगदी बेसिक कलर करेक्शन, क्रॉप, रिसाईझ पासून ते अगदी HDR स्केप, RGB कर्व्ह सारखे फोटो एडिटिंग टूल्स, टोनल कॉन्ट्रास्ट, विग्नेट, ड्रामा, ग्लॅमर ग्लो सारखे अनेक ऍडव्हान्स फिल्टर्स असलेले स्नॅपसीड कोणत्याही फोटो ला जबरदस्त रिजल्ट देऊ शकतात, चांगली गोष्ट म्हणजे गुगल ने ‘Snapseed’ ‘फ्रि’ मध्ये उपलध करून दिले आहे..
*डाउनलोड लिंक -* https://play.google.com/store/apps/details…
*4) VSCO* (Free, Optional In-App Purchases)
फोटो एडिटिंग, विशेषतः वेगवेगळे फिल्टर वापरून फोटो ला आर्टिस्टिक क्रिएटीव्ह लूक देण्यासाठी VSCO हे ऍप आज विशेष पसंत केले जाते, फोटो ग्रेडिंग च्या विविध टूल्स सोबत ऍडव्हान्स कॅमेरा कण्ट्रोल फीचर्स हि VSCO ची खासियत आहे, VSCO चे बेसिक व्हर्शन फ्री असले तरी काही टूल्स व फिल्टर्स साठी तुम्हाला पेड VSCO membership subscription ची आवश्यकता भासू शकते ..
*डाउनलोड लिंक -* https://play.google.com/store/apps/details…
*5) Afterlight 2* ($3)
Afterlight Collective, Inc या कंपनीने विकसित केलेले Afterlight 2 हे पेड ऍप सुद्धा आज मोबाईल फोटो एडिटिंग साठी एक परिपूर्ण ऍप म्हणून नावाजले जाते, फोटो एडिटिंग साठी ऍडजस्टमेन्ट टूल्स, फिल्टर्स, टेक्श्चर्स, फ्रेम्स, क्रॉपिंग व ट्रान्सफॉर्मिंग टूल्स अश्या विविध फीचर्स ने समृद्ध असलेले Afterlight 2 RAW फिले फॉरमॅट सुद्दा सपोर्ट करते, वर नमूद केल्या प्रमाणे Afterlight 2 हे पेड ऍप आहे..
*डाउनलोड लिंक -* https://play.google.com/store/apps/details…
*6) Lens Distortions* (Free, Optional In-App Subscription)
Lens Distortions हे फोटो एडिटिंग ऍप त्यातील इफेक्ट्स साठी ओळखले जाते, मल्टिपल लेयर्स चा वापर करून देता येऊ शकणारे लाईट लीक, फ्लेयर्स, क्लाउड्स या सारखे अत्यंत रियलस्टिक इफेक्ट्स वापरून करता येऊ शकणार अतिशय क्रिएटीव्ह फोटो एडिटिंग हि Lens Distortions ची खासियत आहे, बेसिक व्हर्शन फ्री आहे पण काही प्रीमियम टूल्स व फिल्टर्स साठी 3 ते 5 डॉलर्स (अंदाजे 225 ते 380 रुपये) मोजण्याची गरज भासू शकते..
*डाउनलोड लिंक -* https://play.google.com/store/apps/details…
*7) PicsArt* (Free, Optional In-App Purchases)
जर तुम्हाला फोटो ला 'रिमिक्स' करायचे असेल तर PicsArt तुमच्यासाठी 'परफेक्ट ऍप' साबित होऊ शकते, PicsArt ला फोटोशॉप व पेंट चे कॉम्बिनेशन असेही संबोधले जाते, यात तुम्ही फोटो एडिटिंग तर करू शकताच सोबत त्याला टेक्स्ट, स्टिकर्स, स्पार्कल, ड्रॉईंग टूल्स,फेस एडिट, फेस स्वॅप सारखे टूल्स वापरून तुमच्या आवडीचे 'एकदम हटके' रिमिक्स सुद्धा करू शकता..
*डाउनलोड लिंक -* https://play.google.com/store/apps/details…
*8) PhotoDirector* (Free, Optional In-App Purchases)
कॉम्प्युटर सॉफ्टवेअर क्षेत्रातील एक नावाजलेली कंपनी CyberLink द्वारा विकसित PhotoDirector हे एक 'ऑल राऊंडर' मोबाईल फोटो एडिटिंग ऍप समजले जाते, फोटो री-टच, फोटो ऍनिमेशन, ऑब्जेक्ट क्लोनिंग, सेल्फी एडिटर, मॅजिक ब्रश, व्हाईट बॅलन्स करेक्टर, रेड आय रिमूव्हर, HDR, विग्नेट यांच्या सारखे ऍडव्हान्स टूल्स व फिल्टर्स बनवतात PhotoDirector ला एल परिपूर्ण मोबाईल फोटो एडिटिंग ऍप
*डाउनलोड लिंक -* https://play.google.com/store/apps/details…
तर हे होते मोबाईल प्लॅटफॉर्म वरचे काही सर्वाधिक वापरले जाणारे फोटो एडिटिंग ऍप्स, यांच्या व्यतिरिक्त तुमचे इतर कुठले फेव्हरिट फोटो एडिटिंग ऍप्स असतील तर नक्कीच शेअर करा..
© *शकील शेख, सातारा..*
*Mob. - 9822187905*
*Mob. - 9822187905*
Comments
Post a Comment