© *शकील शेख* समजा तुम्ही आऊटडोअर इव्हेन्ट फोटोग्राफी करताय आणि ऑर्डर संपल्यावर लगेचच सध्याच्या ट्रेंड प्रमाणे पार्टीने सोशल मीडियासाठी तुमच्याकडे काही फोटोंची मागणी केली गेलीये किंवा एखादे कमर्शियल फोटो शूट संपवून प्रवासात असताना प्रेझंटेशनसाठी काही अर्जंट फोटो ताबडतोब देऊ शकता का ? अशी जर कंपनी मॅनेजर कडून विचारणा झालीये किंवा एखाद्या ट्रिप ला गेल्यावर तिथल्या साईट साईंग चे काढलेले फोटो सोशल मीडियावर शेअर करायचेत आणि या सर्व परिस्थिती मध्ये तुम्हाला फोटो एडिट करायचे आहेत पण सोबत लॅपटॉप नाहीये, अशा परिस्थितीत सापडल्यावर काय करायचं ?? ..... उत्तर सोपं आहे….. हातातल्या ‘स्मार्ट’ मोबाईल चा उपयोग करायचा.. होय ! आजच्या जमान्यातले स्मार्ट फोन चे स्पेसिफिकेशन एखाद्या कॉम्प्युटर पेक्षा कमी नाहीयेत आणि त्याच्यातील अँड्रॉईड व IOS ऑपरेटिंग सिस्टीम सुद्धा आणि एव्हढी ऍडव्हान्स झालीये कि याच्यावर कितीही क्रिटिकल ऍप्स आता सहजतेने रन होतायेत याचाच फायदा घेऊन आज अनेक सॉफ्टवेअर डेव्हलपर कंपन्यां मोबाईल वर चालणारे अँड्रॉईड व IOS सपोर्टेड प्रोफेशनल फोटो एडिटिंग ऍप्स डेव्हलप करतायेत ज्याच्यावर ऍड...